अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या सौदी अरेबियाच्या दौर्यावर आहेत. या दौर्यात पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि ट्रम्प यांची भेट घडवून आणण्यास मदत करा अशी विनवणी पाकने सौदीकडे केली आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष या नात्याने ट्रम्प आपल्या पहिल्या विदेश दौर्यानिमित्त रियाध येथे पोहोचले आहेत. ट्रम्प येथे अरब-नाटो परिषदेत सामील होतील. नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्य पुढील महिन्यात भेट होणार आहे. परंतु या भेटीच्या तारख्या अजून जाहीर झालेल्या नाहीत.
अरब-नाटो बैठकीदरम्यान नवाज शरीफ आणि ट्रम्प यांची भेट घडवून आणण्याची व्यवस्था करावी अशी विनंती पाकने सौदी अरेबियाकडे केली आहे. भले भेट अत्यंत कमी वेळेसाठी असो, परंतु ती व्हावी आणि तीदेखील दोघांमध्येच. म्हणजेच भेटीवेळी फक्त ट्रम्प आणि नवाज हेच उपस्थित असावेत असे पाकने सौदीला सांगितले आहे.