वेस्ट टेक्सासमधील एका डेअरी फार्मला भीषण स्फोटानंतर भीषण आग लागली. या घटनेत सुमारे 18,000 गुरे मरण पावल्याचे सांगण्यात येत आहे. ही अशा प्रकारची सर्वात मोठी घटना आहे. टेक्सासमधील डिमिटमधील साउथ फोर्क डेअरी फार्ममध्ये सोमवारी आग लागली.
अमेरिकेतील टेक्सास येथील एका डेअरी फार्ममध्ये स्फोट आणि जाळपोळ झाल्यामुळे सुमारे 18,000 गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग इतकी भीषण होती की संपूर्ण परिसरात धुराचे ढग पसरले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकाला अनेक तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या अपघातात एक जण भाजलाही. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.