मिळालेल्या माहितीनुसार सूडानची राजधानी खार्तूमच्या बाहेर एक लष्करी विमान कोसळले आहे. या विमान अपघातात ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी उशिरा लष्कराने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमानतळावरून उड्डाण घेत असताना विमान कोसळले, त्यात लष्करी कर्मचारी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमीही झाले आहे. दोन मुलांसह पाच जखमी नागरिकांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तसेच "जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अपघातस्थळी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले," असे निवेदनात म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अँटोनोव्ह विमानाच्या अपघातासाठी तांत्रिक बिघाड जबाबदार होता. वाडी सीदना विमानतळाजवळ हा अपघात झाला.
अनेक घरांचे नुकसान झाले
विमान कोसळलेल्या भागात अनेक घरांचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. उत्तर ओमडुरमनमधील रहिवाशांनी सांगितले की विमान अपघातामुळे मोठा स्फोट झाला, ज्यामुळे जवळपासच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला.