मिळालेल्या माहितीनुसार, वॉशिंग्टनच्या ईशान्येला हडसन नदीच्या काठावर असलेल्या कोलविले ट्राइब्स रिझर्व्हेशनमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तसंस्थेने एका स्थानिक अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, गोळीबाराच्या घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे.
गोळीबारानंतर पळून गेलेल्या हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आजूबाजूच्या परिसरातील पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. कोलविले आदिवासी आरक्षण हे आदिवासी क्षेत्र आहे. गुरुवारी दोन जणांचे मृतदेह सापडल्यानंतर या घटनेतील तीन संशयित आरोपींपैकी दोघांना पकडण्यात आले असून एक पोलीस अधिकारी जखमी असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुरुवारी घडलेल्या या घटनेदरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्याच्या बाजूला गोळी लागल्याची माहिती कोलविल आदिवासी आरक्षणाच्या पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. वाहनातून पळून जाणाऱ्या संशयित हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळी झाडली; जो त्याच्या हातावर होता. त्यानंतर जखमी अधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
करी पिंकहॅम आणि जॅचरी होल्ट अशी दोन संशयितांची ओळख पोलिसांनी केली आहे. तिसऱ्या संशयिताची ओळख पटलेली नाही. पोलीस विभागाने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्थानिक पोलिसांनी, एफबीआय, बॉर्डर पेट्रोल, वॉशिंग्टन पेट्रोल आणि पोलिसांनी या आरोपींच्या शोधासाठी रात्रभर ऑपरेशन केले. अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.