धक्कादायक ! बेस्ट फ्रेंडचा मृतदेह कबरीतून काढून दुचाकीवर बसवून फिरायला नेले

शनिवार, 4 डिसेंबर 2021 (22:44 IST)
मैत्रीसाठी लोक काहीही करतात, आपल्या समोर अनेकदा अशा घटना समोर येतात. पण सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याने कोणी हा व्हिडीओ बघितला त्याने लोकांची मने जिंकली आहे. काही मित्रांनी आपल्या मित्राच्या मृत्यू नंतर देखील त्याची शेवटची इच्छा पूर्ण केली. ही घटना दक्षिण अमेरिकन  इक्वेडोर देशातील आहे. 
इक्वेडोर येथील राहणारा एरिक सेडिनो मरण पावला, पण त्याच्या मित्रांनी एरिक चा मृतदेह कबरीतून काढून त्याचा मृतदेह दुचाकीवरून  मयत मित्राच्या आवडत्या ठिकाणी फिरायला नेला. एरिकच्या मित्रांनी एरिक चा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यासाठी त्याच्या पालकांची परवानगी घेतली होती. 
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ मध्ये सुमारे 7 जणांचा गट दुचाकी घेऊन रस्त्यावर आला.  या मध्ये दुचाकीवर दोघांनी एरिक चा मृतदेह मध्यभागी ठेवला. डेलिस्टार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, हे मित्र आपल्या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करत होते.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती