याआधी, कंझर्व्हेटिव्ह नेत्यांमधील मतदानाच्या चौथ्या फेरीतही सुनक अव्वल ठरले होते. त्यांना सर्वाधिक 118 मते मिळाली. त्याचवेळी मतदानाच्या तीन फेऱ्यांमध्ये सुनकने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. मतदानाच्या प्रत्येक फेरीत सुनक यांच्या बाजूने मतांची संख्या सातत्याने वाढत आहे. जर ते ब्रिटनचे पंतप्रधान झाले तर ते भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान असतील.
ऋषी सुनक हे बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्रालय सांभाळत होते, परंतु जॉन्सनच्या धोरणांमुळे आणि निर्णयांमुळे कॅबिनेट जॉन्सनच्या विरोधात गेले आणि त्यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन बोरिस यांचे सरकार पाडले. सुनक हे उत्तम प्रशासक मानले जातात. ऋषी सुनक हे भारतातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.