247 कोटींना विकला प्राचीन चिनी कटोरा

चीनमधील सांग राजवंशाच्या काळातील सुमारे एक हजार वर्षांपूर्वीच्या कटोर्‍याला हाँगकाँगमध्ये हल्लीच झालेल्या एका लिलावामध्ये तब्बल 3.77 कोटी डॉलर म्हणजे सुमारे 247 कोटी रूपये एवढी प्रचंड किंमत मिळाली आहे. इसवी सन 960 ते 1127 या कालखंडातील पोर्सलीनपासून बनलेल्या या कटोर्‍याच्या लिलावाने प्राचीन भांड्याच्या लिलावाचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत.
 
लिलावामध्ये सर्वाधिक बोली लावून हा कटोरा खरेदी करणार्‍या व्यक्तीचे नाव मात्र अजून सार्वजनिक करण्यात आलेले नाही. चीनवर सत्ता असलेल्या उत्तर सांग राजवटीच्या काळात वापरात असलेल्या हा शाही व अतिशय दुर्मीळ कटोरा मूळ रूपात ब्रश धुण्यासाठी बनविण्यात आला होता. 13 सेंटीमीटर व्यासाच्या या कटोर्‍यावर निळ्या रंगाची चमकदार पॉलिश करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती