ऑस्ट्रेलियात व्हिसा नियम बदलले

बुधवार, 19 एप्रिल 2017 (11:09 IST)
ऑस्ट्रेलियाने मंगळवारी व्हिसा नियमात बदल केला असून याचा फटका हजारो भारतीयांना बसणार आहे. ऑस्ट्रेलियात भारतीय कामगारांचे प्रमाण सर्वाधिक असून यानंतर ब्रिटन आणि चीनचा क्रमांक लागतो. बरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने हा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये परदेशी कुशल कामगारांसाठी 457 व्हिसा दिला जात होता. यानुसार कामगारांना चार वर्षापर्यंत ऑस्ट्रेलियापर्यंत कामानिमित्त राहता येत होते. पण मंगळवारी सरकारने हा व्हिसाच रद्द केला आहे. ऑस्ट्रेलिया हा निर्वासितांचा देश आहे. पण ऑस्ट्रेलियात नोकरीमध्ये स्थानिक तरुणांनाच प्राधान्य मिळाले पाहिजे अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी दिली. ऑस्ट्रेलिया फर्स्ट असा नाराही त्यांनी याप्रसंगी दिला. 

वेबदुनिया वर वाचा