न्यूयॉर्क- या जगात विचित्र माणसांची मुळीच कमतरत नाही. जिथे तिथे काही तरी भन्नाट प्रकार करणारी माणसं पाहायला मिळत असतात. आता अमेरिकेतल्या न्यूयॉर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगळी-वेगळी घटना घडली आहे. तिथे विमानातून प्रवास करण्यासाठी एक महिला चक्क तिच्या मोराला घेऊन विमानतळावर आली होती पण महिला आणि मोराला घेऊन विमानाने प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आली.