अफगाणमध्ये जाण्यासा पाक नागरिकांनाही पासपोर्ट अनिवार्य

इस्लामाबाद- पाकिस्तानाचे नागरिक आता पासपोर्टशिवाय शेजारी देश अफगाणिस्तानात जाऊ शकणार नाहीत. अफगाण प्राधिकरणाने पाकिस्तानी नागरिकांचा दस्तऐवजविना देशात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. हा नियम 1 जानेवरीपासून लागू करण्यात आला.
 
7 महिन्यांपूर्वी इस्लामाबादने देखील कठोर सीमा नियंत्रण पावले उचलली होती. याद्वारे पाकिस्तानात दहशतवादी कारवाया रोखण्याचा हेतू होता. तज्ञांनुसार अफगाणच्या या निर्णयानंतर अनेक आदिवासींना अडचण होईल, कारण त्यांचे नातलग दोन्ही दोशांच्या सीमवर्ती भागात वास्तव्य करतात.

वेबदुनिया वर वाचा