अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या हवाई हल्ल्यांत (ड्रोन) वाढ करण्याची शक्यता असून, पाकिस्तानला दिल्या जात असलेल्या आर्थिक मदतीवर गदा आणण्याची भूमिका अमेरिका घेण्याची शक्यता आहे. पाकमधील दहशतवाद्यांच्या तळांसंदर्भात अमेरिकेकडून कठोर भूमिका घेतली जाणार आहे. पाकिस्तानकडून तालिबान्यांना आर्थिक रसद पुरवली जात असल्यामुळेच ते अफगाणिस्तानवर शक्तिशाली हल्ले करत असल्याचंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.