दरम्यान, पाकिस्तानने कठोर कारवाई करत पीओकेमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. भारत पीओकेवर हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. यामुळेच पीओकेमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. झेलम व्हॅलीमध्ये लाऊडस्पीकर वाजवण्यासही बंदी आहे. एवढेच नाही तर लग्नसमारंभात संगीत वाजवण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह म्हणाले की, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानांवरून हल्ला निश्चित असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांचे समन्वयक राणा एहसान अफजल खान यांनीही भारताला धमकी दिली आहे.