घटनास्थळावरूनच मृतदेह बाहेर काढण्यात आले. वृत्तानुसार, मदत आणि बचाव कार्य सुरू असून सविस्तर अहवाल येणे बाकी आहे. समुद्रसपाटीपासून 3500 मीटर उंचीवर असलेल्या लामजुरा खिंडीजवळ हेलिकॉप्टरला अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलट शेट बी गुरुंग व्यतिरिक्त पाच मेक्सिकन नागरिक उपस्थित होते.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मनांग एअरचे हेलिकॉप्टर माउंट एव्हरेस्टजवळ बेपत्ता झाले आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे महाव्यवस्थापक प्रताप भानू तिवारी यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर 15मिनिटांनी संपर्क तुटला.