भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास पाक इच्छूक

शुक्रवार, 23 डिसेंबर 2016 (13:11 IST)
तीन दिवसीय बोस्निया दौर्‍यावर आलेल्या नवाज शरीफ यांनी राजधानी साराजेवो येथे संसंदीय समूहाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, पाकिस्तानात सध्या कोणत्याही कुख्यात दहशतवादी संघटनेचे अस्तित्व नाही. अल-कायदा आणि तेहरिक-ए-तालिबानचा आम्ही कणखरपणे सामना केला. दहशतवाद्यांविरुद्ध ठोस कारवाई करताना पाकिस्तानने मोठी किंमत चुकविली आहे, अशी कबूली नवाज शरीफ यांनी दिली. पाकच्या भूमितून अल-कायदाचा सफाया केल्याचे ते ठासून सांगतात. दहशतवादाच्या मुद्यावर दृढनिश्‍चयी कारवाई करण्यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. पुढे बोलतांना नवाज शरीफ म्हणतात की, भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास पाकिस्तान इच्छूक आहे. काश्मीर असो वा अन्य कोणताही मुद्दा त्यावर तोडगा काढण्यास राजी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पठाणकोट, उधमपूर आणि उरी हल्ल्यामुळे भारत-पाक यांच्यातील द्वीपक्षीय संबंधांत प्रचंड कटूता आली आहे. उभय देशांतील शांतता चर्चा पुरती ठप्प आहे.

वेबदुनिया वर वाचा