म्यानमारमधील 2021 च्या लष्करी उठावापासून तुरुंगात असलेल्या नेत्या आंग सान स्यू की यांना माफ करण्यात आले आहे. मीडिया वृत्तावर, म्यानमारच्या माजी नेत्या आंग सान स्यू की यांना 19 गुन्ह्यांपैकी 5 गुन्ह्यांसाठी माफ करण्यात आले आहे ज्यासाठी तिला दोषी ठरवण्यात आले होते आणि त्यांना एकूण 33 वर्षांचा तुरुंगवास झाला होता,
म्यानमार मध्ये 2021 च्या नंतर तुरुंगात असलेल्या 78 वर्षाच्या आंग सान स्यू की यांना विविध गुन्ह्यांमध्ये ३३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी 2021 रोजी लष्कराने देशात एक वर्षासाठी सत्तापालट केला होता. नंतर ही आणीबाणी वाढवण्यात आली आणि ही आणीबाणी पुन्हा चौथ्यांदा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे.