मंकीपॉक्स कोरोनाप्रमाणे घाबरवणार! डब्ल्यूएचओचे वक्तव्य

रविवार, 29 मे 2022 (14:08 IST)
कोरोना महामारी अजून संपलेली नाही आणि जगातील अनेक देशांमध्ये मंकी पॉक्सने खळबळ उडवून दिली आहे. युरोपियन युनियनच्या रोग एजन्सीचे म्हणणे आहे की आतापर्यंत मंकीपॉक्सच्या 219 प्रकरणांची पुष्टी झाली आहे, जी 20 देशांमध्ये पसरली आहे. डब्ल्यूएचओच्या वक्तव्यामुळे युरोपीय देशांत घबरहाट पसरली आहे कारण येत्या काही दिवसांत त्यांची प्रकरणे वाढू शकतात असा इशारा संघटनेने दिला आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीप्रमाणे मंकी पॉक्स ही महामारी सिद्ध होणार नाही. मात्र WHO या प्रकरणी मौन बाळगून आहे.
 
मंकीपॉक्सची जगातील पहिली मानवी केस 1970 मध्ये आढळली. सामान्य भाषेत स्मॉल पॉक्स आणि मंकी पॉक्स हे सामान्य आहेत. या वर्षी पुन्हा एकदा युरोपीय आणि आफ्रिकन देशांमध्ये मंकी पॉक्सने थैमान घातले आहे. आतापर्यंत पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील 11 देशांसह 20 देशांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे. सध्या भारताच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणजे देशात एकही केस समोर आलेली नाही.
 
2020 मध्ये, जगाने प्रथमच कोरोना महामारीचे नाव ऐकले आणि एका वर्षातच ती जगभरात महामारीच्या रूपात उदयास आली. कोट्यवधी लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोनाचे जगातून अद्याप समूळ उच्चाटन झालेले नाही. दरम्यान, मंकी पॉक्सच्या दस्तकाने जगासमोर आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. अमेरिका, ब्रिटन यांसारख्या विकसित देशांमध्येही मंकी पॉक्सचा प्रसार झाला आहे. तथापि, यूएस आरोग्य तज्ञांचा असा दावा आहे की हा रोग महामारी बनण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा कोरोनासारखा संसर्गजन्य नाही.
 
भारत या संसर्गासाठी तयार आहे, कारण हा संसर्ग युरोप, अमेरिका आणि इतर स्थानिक नसलेल्या देशांमध्ये वेगाने पसरत आहे. मात्र, भारतात अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. तज्ञांनी असामान्य लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवण्यावर भर दिला, उच्च ताप, मोठ्या लिम्फ नोड्स, अंगदुखी, पुरळ इत्यादी असामान्य लक्षणांवर लक्ष ठेवले पाहिजे विशेषत: ज्यांना मंकी पॉक्सग्रस्त देशांमधून प्रवासाचा इतिहास आहे त्यांच्यासाठी विशेष .
 
ज्यांना लक्षणे दिसतात, ते स्वेब द्वारे नमुने तपासू शकतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने या विषाणूंच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा नोंदणीकृत केल्या आहेत.  लोकांनी घाबरून जाऊ नये आणि भूतकाळात मंकीपॉक्सची लागण झालेल्या लोकांशी जवळचा संपर्क टाळावा. असे तज्ञांनी म्हटले आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती