7 महिन्याचे मूल इटलीच्या भूकंपात बचावले

बुधवार, 23 ऑगस्ट 2017 (11:04 IST)
देव तारी त्याल कोण मारी म्हणतात, त्याचा अनुभव इटलीमध्ये झालेल्या भूकंपात आला आहे. भूकंपामुळे कोसळलेल्या घरात अडकलेले एक 7 महिन्यांचे बालक मोठाच दैवी चमत्कार झाल्यासारखे बचावले आहे. इटलीमधील हॉलिडे आयलॅंड ईस्क्‍या मध्ये झालेल्या भूकंपानंतर पडलेल्या घराच्या ढिगातून अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी पास्कल नावाच्या या छोट्या बालकाला सात तासांनंतर जिवंत बाहेर काढले आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांनी सलग अनेक तास मेहनत केल्याचे सांगण्यात आले आहे.
 
सोमवारी रात्री 8.57 च्या दरम्यान इटलीत भूकंप झाला होता. सुमारे 3.35वाजता दगडमातीच्या ढिगातून बाहेर काढल्यानंतर ताबडतोब पास्कलला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
या पडलेल्या घरात पास्कलचे दोन मोठे भाऊ-मिटियास आण्‌ सिरो यांनाही नंतर वाचविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ईस्क्‍या बेटावरील कॅसामिकिओला या खेड्याचेच्या धक्‍क्‍याने सर्वाधिक नुकसान झालेले आहे. या भूकंपात दोन महिला जखमी झाल्या असून 35 पेक्षाही अधिक जण जखमी झाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा