Israel Gaza War: गाझा पट्टीवर इस्रायलचा हवाई हल्ला, दहशतवादी संघटनेचे दोन प्रमुख कमांडर ठार

सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (19:24 IST)
Israel Gaza War:दहशतवादी इस्लामिक जिहादचा दुसरा टॉप कमांडर खालिद मन्सूर हा गाझा पट्टीवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झाला. या हवाई हल्ल्यात आतापर्यंत इस्लामिक जिहादचे दोन कमांडर मारले गेले आहेत. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की, गाझामधील हिंसाचारात मृतांची संख्या 32 झाली असून त्यात सहा मुलांचा समावेश आहे. 
 
ताज्या हल्ल्यांमध्ये 250 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, असे मंत्रालयाने सांगितले. त्याचवेळी, इस्रायली संरक्षण दल (IDF) नुसार, हवाई हल्ल्यात 15 हमास दहशतवादी मारले गेले आहेत. इस्लामिक जिहादच्या अल कायदा ब्रिगेडने रविवारी पुष्टी केली की दक्षिण गाझामधील राफा शहरात कमांडर खालिद मन्सूर आणि त्याचे दोन साथीदार हवाई हल्ल्यात ठार झाले. गाझा पट्टीवरील हल्ल्यानंतर पॅलेस्टिनी संघटना हमासनेही 2 तासांत गाझा पट्टीवर इस्रायलच्या दिशेने 100 रॉकेट डागले.
 
एक दिवसापूर्वी, इस्रायलने हवाई हल्ल्यात इराण समर्थित गटाच्या उत्तर गाझा प्रदेशातील कमांडरला ठार केले. 2021 मध्ये 11 दिवसांच्या युद्धानंतर इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांमध्ये हवाई हल्ल्यांमुळे पुन्हा सीमापार संघर्ष सुरू झाला आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती