इस्रायलचा दावा- हिजबुल्लाचा कमांडर इब्राहिम अकील ठार

शनिवार, 21 सप्टेंबर 2024 (10:29 IST)
प्रथम पेजर स्फोट, त्यानंतर रेडिओ सेट आणि वॉकी-टॉकीजचा स्फोट झाल्यानंतर इस्रायली सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी हिजबुल्लाहवर हवाई हल्ले सुरूच ठेवले आहेत. एका वृत्तानुसार, इस्रायली लष्करानेच ही माहिती दिली आणि बेरूतमध्ये काही ठिकाणी हल्ले केले असल्याचे सांगितले.

या हल्ल्यानंतर माहिती देताना लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, बेरूतच्या उपनगरी भागात इस्रायलच्या हल्ल्यात किमान आठ जण ठार तर 59 जण जखमी झाले आहेत. तर एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, बेरूतमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात वरिष्ठ हिजबुल्ला लष्करी अधिकारी इब्राहिम अकील यांना लक्ष्य करण्यात आले.

या हल्ल्यात हिजबुल्लाहचा कमांडर इब्राहिम अकीलचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे की, बेरूतवरील हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा वरिष्ठ अधिकारी इब्राहिम अकील मारला गेला आहे.

गेल्या चार दिवसांपासून इस्त्रायलकडून मोठ्या प्रमाणात नुकसान आणि हल्ले होत आहेत, याच क्रमात गेल्या मंगळवारी लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या लढवय्यांकडून संवादासाठी वापरण्यात येणारे हजारो दूरध्वनी नष्ट करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन स्फोटांमध्ये 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 3000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती