तुर्की पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईत इसिसच्या 70 दहशतवाद्यांना अटक केली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी इसिसच्या वरिष्ठ सदस्यासह 10 विदेशी संशयितांनाही अटक केली असून हे अटक केलेले दहशतवादी हे इराकचे नागरीक असल्याचे समोर आले आहे.
एका वेळी नऊ ठिकाणी तपास अधिकाऱ्यांनी छापे टाकून त्यांना अटक केली. ही कारवाई सिरीया आणि अमेरिकन स्ट्राईक नंतर स्थिरता आणण्यासाठी केल्याचे समजते. इस्तांबूलमधील दुसऱ्या एका कारवाईत पोलिसांनी इसिसच्या 51 संशयितांना अटक केली. पोलिसांनी इस्तंबूलच्या 6 जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. त्यामध्ये त्यांच्या हाती काही महत्वाची कागदपत्रे आली आहेत, तसेच तेथून त्यांनी डिजीटल साहित्यही जप्त केले आहे. तुर्कस्तानमध्ये इसिसने केलेल्या हल्ल्यात 300 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला होता. हा हल्ला दहशतवाद्यांनी बॉम्ब, रॉकेट आणि बंदुकीच्या साह्याने केला होता.