वॉशिंग्टन येथे कॉल सेंटर घोटाळ्यात 4 भारतीय, एक पाकिस्तानी दोषी

बुधवार, 7 जून 2017 (13:20 IST)
अमेरिकन नागरिकांची बनावट कॉल सेंटरद्वारे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयाने चार भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाला दोषी ठरवले आहे. राजूभाई पटेल (32), विराज पटेल (33), दिलीपकुमार पटेल (53) आणि पाकिस्तानी नागरिक फहाद अली (25) अशी या आरोपींची नावे आहेत. तर हार्दिक पटेल या आरोपीला 2 जून रोजीच न्यायालयाने दोषी ठरवले होते. आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
 
अमेरिकन नागरिकांची कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणूक केल्याचे प्रकरण गेल्या वर्षी उघडकीस आले होते. याप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयात सुनावणी सुरु होती. अमेरिकेत राहणारा आणि याप्रकरणातील आरोपी हार्दिक पटेलसह अन्य आरोपींनी न्यायालयात गुन्ह्याची कबूली दिली. हार्दिक पटेल हा भारतातील कॉल सेंटरचे दैनंदिन कामकाज बघत होता. यासाठी तो भारतातील त्याच्या साथीदारांशी समन्वय साधण्याचे काम करत होता असे त्याने न्यायालयात सांगितले. न्यायालयाने कॉल सेंटर घोटाळ्यातील आरोपींना दोषी ठरवले आहे. या सर्वांना शिक्षा कधी सुनावली जाईल हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
 

वेबदुनिया वर वाचा