अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नूयी आर्थिक अजेंड्याच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करणार आहेत. कारण नूयी यांचा स्ट्रेटेजिक पॉलिसी फोरममध्ये समावेश केला आहे. ट्रम्प यांनी सल्लागार मंडळात समावेश करण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावांची घोषणा केली. ट्रम्प यांच्या सल्लागार मंडळात समावेश असलेल्या नूयी या भारतीय वंशाच्या एकमेव महिला आहेत. इंद्रा नूयी या अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या हिलरी क्लिंटन यांच्या समर्थक आहेत.