चीनने नोटबंदीला सांगितले धाडसी निर्णय

मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (11:12 IST)
भारतात 1000 आणि 500 रुपयांच्या नोटबंदीच्या निर्णयला 'आश्चर्यजनक आणि धाडसी' सांगत चीनच्या सकरारी मीडियाने म्हटले आहे की मोदींची ही लढाई भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधातील आहे, अशी प्रतिक्रिया चीनमधील माध्यमांतून प्रसिध्द करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांचा निर्णय धाडसी असला तरी यामुळे भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा बसेल की नाही, हे पहावे लागेल. तसेच यासंदर्भात त्यांनी चीनचे पंतप्रधान जिनपिंग यांच्याकडूनही नव्या कल्पना घ्याव्यात, असाही सल्ला या वृत्तामधून देण्यात आला आहे.
 
‘ग्लोबल टाईम्स’ वृत्तपत्रात म्हटले आहे की, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्यासाठी मोदींनी उचलेले पाऊल धाडसी आहे. काळे धन आणि भ्रष्टाचाराविरोधात ही लढाई आहे. कारण जास्तीत जास्त बेकायदा व्यवहार हे रोखीने होत असतात. भारतात ५०० आणि १००० च्या चलनी नोटांचे प्रमाण ८० टक्के आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून काळा पैसा, भ्रष्टाचार आणि कर चुकविणार्‍यांवर कारवाईसाठी कडक पावले उचलली आहेत. मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला आहे. तो धाडसी आहे. पण भ्रष्टाचार संपविण्यासाठी केवळ एवढेच पुरेसे नाही. यासाठी यंत्रणेत सुधारणा करणे गरजेचे आहे. याकामी दिल्लीने बिजिंगकडून नव्या कल्पना घ्याव्यात. चिनचे पंतप्रधान जिनपिंग यांनी कडक धोरणे आखून चुकीचे काम करणार्‍या एक लाख अधिकार्‍यांना दंड केला आहे. मोदींनीही याबाबत जिनपिंग यांच्याकडून नव्या कल्पना घ्याव्यात.

वेबदुनिया वर वाचा