पृथ्वीवरील अनेक देशांनी मोठ्या संख्येने अवकाशात पाठवलेले उपग्रह आपल्या कक्षेत पृथ्वीभोवती फिरत आहेत. याबरोबरच अनेक प्रकारचा कचराही फिरत आहे. अशा स्थितीत हा कचरा आणि उपग्रह यांच्यात टक्कर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास उपग्रहांचे मोठे नुकसान होईल अथवा ते निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अवकाशात सध्या 7 लाख 50 हजार अशा लहान, मोठ्या वस्तू प्रचंड वेगाने फिरत आहेत. त्यांचा व्यास 1 ते 10 सेंटीमीटपर्यंतही असू शकतो. या वस्तू लहान असल्या तरी त्या अत्यंत धोकादायक ठरू शकतात. कारण, एखादा लहान तुकडाही मोठे विमान अथवा उपग्रहाला नष्ट करू शकतो. हा कचरा हटवण्याचा गेल्या वर्षी जपानने केलेल्या प्रयत्न अपयशी ठरला होता.