बेल्जियममध्ये पुन्हा पुराचे कहर,वाहने वाहून गेली

रविवार, 25 जुलै 2021 (11:52 IST)
बेल्जियममधील बर्‍याच भागात मुसळधार पावसामुळे झालेल्या पुराने  पुन्हा एकदा कहर केला.रस्ते ओसंडून वाहू लागले आणि जोरदार प्रवाहात बरीच वाहने वाहून गेली.
 
विशेषतः ब्रुसेल्स शहराच्या वालून ब्रबांत आणि नामूर प्रांतावर या पुराचा परिणाम झाला.या प्रांतांमध्ये आधीच पुरामुळे नुकसान झाले आहे.यात 36 लोक मरण पावले आहेत आणि 7 लोक बेपत्ता आहेत. बेल्जियमच्या 'संकट केंद्र' ने बऱ्याच दिवस देशात हवामान खराब राहण्याचा इशारा दिला आहे.
 
दिवसभर मुसळधार पावसामुळे बरेच नुकसान झाले. उपनगराध्यक्ष रॉबर्ट क्लोसेट यांनी सांगितले की, पुराचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाची तैनाती करण्यात आली आहे. ते म्हणाले की मी आयुष्यभर इथे राहिलो आहे आणि यापूर्वी असे कधी पाहिले नव्हते.
 
गेल्या आठवड्याच्या पुरामुळे मोठा फटका बसलेल्या लीज प्रांतातील परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की,आठवड्याच्या शेवटी नद्यांमध्ये वेग येण्याची शक्यता नाही आणि ते म्हणाले की, अद्याप हे क्षेत्र रिकामे करण्याची गरज नाही.
 
गेल्या आठवड्यात बेल्जियम आणि शेजारील देशातील पूरात मृतांचा आकडा 210 च्या वर गेला असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती