ब्राझीलमधील फर्नांडो डी नारोन्हा या बेटावर तब्बल १२ वर्षांनतर बाळाचा जन्म झाला आहे. या बेटाची लोकसंख्या जवळपास तीन हजार आहे. मात्र या ठिकाणी मुलांना जन्म देण्यास बंदी असल्याने एकही प्रसुतीगृह नाही. हे बेट जगातील सुंदर द्विपकल्पांपैकी एक आहे. या बेटावर ब्राझीलमधील प्रसिद्ध अभयारण्य आहे. या अभयारण्यात अनेक दुर्लभ प्राणी, पक्षी तसेच वनस्पती आहेत. या वन्यजीवांच्या रक्षणासाठी बेटावर लोकसंख्या नियंत्रणाचे अत्यंत कडक निर्बंध आहेत.