पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये सीपीईसीशी संबंधित चिनी अभियंत्यांवर फिदाईन हल्ला, अनेक मृत

शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (09:51 IST)
पाकिस्तानच्या ग्वादर शहरात एक मोठा स्फोट झाला आहे, ज्यामध्ये किमान 9 चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.बलुचिस्तान पोस्टच्या अहवालात असे म्हटले आहे.चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) शी जोडलेल्या रस्त्याच्या बांधकामात गुंतलेल्या चिनी अभियंत्यांच्या ताफ्यात हा स्फोट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
 
पाकिस्तानच्या आघाडीच्या वृत्तपत्र ने अहवालात म्हटले आहे की, चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर फदीन हल्ला झाला आहे. बलुचिस्तान सरकारच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने वृत्तपत्राने म्हटले आहे की, किमान दोन मुले ठार झाली आहेत आणि काही इतर जखमी आहेत. चिनी अभियंता जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. 
 
एक महिन्यापूर्वी, चिनी अभियंत्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा खैबर पख्तूनख्वा प्रांतात स्फोट झाला,त्यात नऊ चीनी नागरिकांसह 13 जणांचा मृत्यू झाला.पाकिस्तानने सुरुवातीला म्हटले होते की, बसमधील बिघाडामुळे गॅस गळती झाली आणि त्यामुळे स्फोट झाला. मात्र, चीनच्या दबावाखाली पाकिस्तानने याला बॉम्बस्फोट म्हटले आणि तपास सुरू केला. नंतर पाकिस्तानने या स्फोटामागे परकीय शक्तींचा हात असल्याचा आरोप केला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती