एलोन मस्क देणार ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा

बुधवार, 21 डिसेंबर 2022 (13:21 IST)
अब्जाधीश उद्योगपती एलोन मस्क यांनी आता ट्विटरच्या संदर्भात एक नवी आणि मोठी घोषणा केली आहे. लवकरच ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, हे काम करण्यासाठी त्यांना पदाचा सांभाळ करणारी व्यक्ती सापडताच ते सीईओ पदाचा राजीनामा देतील . 

नुकत्याच झालेल्या ट्विटर पोलनंतर मस्कने हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यायचा का, असा प्रश्न त्यांनी ट्विटर पोलद्वारे केला होता. या मतदानात ५७.५ टक्के लोकांनी मस्क यांच्या राजीनाम्याच्या बाजूने मतदान केले आहे. 
 
इलॉन मस्क यांनी 19 डिसेंबर रोजी हे ट्विटर पोल आयोजित केले होते आणि पोलचे जे काही निकाल असतील ते ते फॉलो करणार असल्याचे सांगितले होते. या पोलवर 17,502,391 लोकांनी मतदान केले, ज्यामध्ये 57.5 टक्के लोक मस्क यांच्या राजीनाम्याच्या बाजूने होते, तर 42.5 टक्के लोकांनी ट्विटरचे सीईओ म्हणून राहावे असे सांगितले. 
 
आपल्या राजीनाम्याच्या घोषणेसोबतच इलॉन मस्क यांनी भविष्यातील योजनांचा खुलासाही केला आहे. त्यांनी म्हटले आहे की सीईओ म्हणून कोणीतरी पदभार स्वीकारताच ते राजीनामा देतील आणि कंपनीतील सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीमवर लक्ष ठेवतील. 
 
Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती