ट्रम्प ठरले ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’

न्यूयॉर्क- अमेरिकेतील प्रसिद्ध मासिक ‘टाइम‘ तर्फे दरवर्षी देण्यात येणार्‍या पर्सन ऑफ द इयर पुरस्कारासाठी यंदा अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निवड करण्यात आली आहे. ‘टाइम‘ मासिकाच्या मुखपृष्ठावर माझा फोटो येणे ही माझ्यासाठी गौरवास्पद बाब असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
टाइम मासिकातर्फे दरवर्षी एक व्यक्ती किंवा संस्थेची पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड केली जाते. यंदा पर्सन ऑफ द इयरच्या स्पर्धेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर हिलरी क्लिंटन, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचे आव्हान होते. या सर्वांना पिछाडीवर टाकत डोनाल्ड ट्रम्प यांनी टाइम पर्सन ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावला आहे. ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’मध्ये हिलरी क्लिंटन या दुस-या स्थानी आहेत. तर द हॅकर हा ग्रुप तिस-या स्थानी आहे. गेल्या वर्षी जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांची टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली होती.
 
टाइमच्या पर्सन ऑफ द इयर या पुरस्कारासाठी होणाऱ्या ऑनलाइन मतदानात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आघाडी घेतली होती. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजांना त्यांनी मागे टाकले होते.

वेबदुनिया वर वाचा