अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मंगळवार, 5 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात मुख्य लढत होती. काही ठिकाणी मतमोजणी सुरू आहे, मात्र अमेरिकन कायद्यानुसार ट्रम्प यांना विजयी घोषित करण्यात आले.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. वृत्तसंस्थाने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश मतांची मोजणी पूर्ण झाली असून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.
रिपब्लिकन पक्षाने सिनेटमध्ये विजय मिळवला आहे. ट्रम्प यांनी सिनेटच्या विजयाचे कौतुक केले. रिपब्लिकनने कर कपात, इमिग्रेशन सुधारणा आणि फेडरल नियमन मागे घेण्यासह एक मजबूत अजेंडा पुढे केल्यामुळे, ट्रम्प यांनी धोरणात्मक बदलांची कल्पना केली आहे.