कॉसमॉस बँक सर्व्हर सायबर हल्ला प्रकरणी प्रमुखाला अटक

शनिवार, 6 मार्च 2021 (16:18 IST)
कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करुन ९४ कोटी ४२ रुपये लुटणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीतील भारतातील रुपे कार्डमार्फत झालेल्या अडीच कोटी रुपयांच्या फसवणूकीतील टोळी प्रमुखाला संयुक्त अरब अमिराती (युएई) पोलिसांनी अटक केली. सुमेर शेख (वय २८, सध्या रा. दुबई, मुळ रा. मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांकडून आरोपीच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रीय तपास संस्थेच्या माध्यमातून यूएई पोलिसांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
 
कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर हल्ला करुन जगभरातील २८ देशातून ९४ कोटी ४२ लाख रुपये काढण्यात आले होते. त्यासाठी परदेशात व्हिसा डेबिट कार्डचा वापर करण्यात आला होता. तर, भारतात रुपे कार्डचा वापर केला गेला होता.देशातील १७ शहरांमधील एटीएममधून अडीच कोटी रुपये काढण्यात आले होते. हे क्लोन केलेले रुपे कार्ड सुमेर शेख याने आपली पत्नी व नातेवाईकांमार्फत देशभरातील साथीदारांना पुरविले होते. पुणे पोलिसांनी सुमेर शेख याची पत्नी व इतर अशा १२ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती