भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, लाहोरमध्ये ३५-४० मिनिटे सलग बॉम्बस्फोट, आपत्कालीन सायरन वाजला; लाहोरमध्ये रस्त्यावर झालेले बॉम्बस्फोट (Lahore Serial Blast) कोणी केले हे अजून कळलेले नाही. आतापर्यंत कोणीही या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. ही दहशतवादी कृती देखील असू शकते. अशी माहिती समोर येत आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, लाहोरमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची बातमी समोर आली आहे. एकामागून एक अनेक स्फोट झाले आहे. हे स्फोट कोणी केले हे अद्याप कळलेले नाही. ही दहशतवादी कृती देखील असू शकते. , हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. लाहोरच्या वॉल्टन विमानतळ परिसरात एकामागून एक अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. मिळालेल्या माहितीनुसार, हे स्फोट सुमारे ३५-४० मिनिटे सुरू राहिले. एका इमारतीसमोर हा स्फोट झाला. त्यानंतर इमारतीच्या वर धूर उठताना दिसला. लाहोरमधील गुलबर्ग परिसर आणि वॉल्टन विमानतळाजवळील नसिहाबाद आणि गोपालनगर हे भागही स्फोटाचे बळी ठरले आहे. या घटनेनंतर गोंधळाचे वातावरण आहे.