चीनने पाकला दानमध्ये दिले कोरोना डोस

बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (14:57 IST)
चीनने पाकिस्तानकडे पाच लाख कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा सुपुर्द केला. चीनने पाकिस्तानला या लसी दानमध्ये दिल्या आहेत. या आठवड्यात पाकिस्तानात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. चीनचे पाकिस्तानातील राजदूतनाँग राँग यांनी रावळपिंडीच्या नूर खान एअर बेसवर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याकडे औपचारिकपणे या लसींचा साठा सुपुर्द केला.
 
दरम्यान, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील आरोग्यमंत्री यासमीन राशिद यांनी नागरिकांना स्वतःच जबाबदारीवर लस टोचून घ्या, असे सांगितले आहे. या लसीचे साइड इफेक्टही आहेत. काही देशांमध्ये लस घेतल्यानंतर मृत्यूही झाले आहेत असे आरोग्यमंत्री राशिद यांनी सांगितले. जॉन हॉफकिन्स विद्यापीठानुसार, पाकिस्तानात आतापर्यंत 5 लाख 46 हजार 428 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 11 हजार 683 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती