जॉन्सन अँड जॉन्सन देणार 2672 कोटींची नुकसान भरपाई

गुरूवार, 24 ऑगस्ट 2017 (08:32 IST)

लहान मुलांची उत्पादने बनवणारी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने महिलेला 2672 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी असे आदेश अमेरिकेतील कोर्टाने दिले आहेत. पावडर वापरल्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला होता. ज्यामध्ये कोर्टात महिलेच्या बाजूने निकाल लागला.

कंपनीने कॅन्सरचा धोका असल्याचा इशारा लहान मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांवर दिला नसल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं आहे. याप्रकरणी एवढा दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता कंपनी या निर्णयाला आव्हान देण्याच्या तयारीत आहे.

दुसरीकडे पावडर वापरल्यामुळे कॅन्सर झाला, याचे सबळ पुरावे नाहीत. त्यामुळे आम्ही कोर्टाच्या निर्णयाविरोधात दाद मागू, असं जॉन्सन अँड जॉन्सनचे प्रवक्ते कॅरोल गुडरिच यांनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा