पूर्व चिनी सागरात गेले आठवडाभर जळत असलेले इराणी तेलवाहू जहाज सांची आज चिनी सागरात बुडाल्याची माहिती चिनी माध्यमांनी दिली आहे. या तेलवाहू जहाजावर असलेल्या 30 इराणी आणि 2 बांगला देशी अशा 32 खलाशांपैकी कोणीही वाचले असण्याची शक्यता नसल्याचे इराणी अधिकारी मोहम्मद रास्तद यांनी स्पष्ट केले आहे. 32 पैकी 3 मृतदेह लाइफ बोटीवर मिळाले. सांचीवरील ब्लॅक बॉक्स सापडला होता, मात्र त्यातील विषारी वायूंमुळे तो पुन्हा टाकून द्यावा लागला. आठवडाभर 13 जहाजे अणि इराणी कमांडो सांचीच्या बचाव कार्यात गुंतलेले होते.
6 जानेवारी रोजी शांघायपासून 260 किमी अंतरावर सांची आणि एका मालवाहू जहाजाची टक्कर झाली होती. सांची तेलवाहू जहाज 1 लाख 36 हजार टन अल्ट्रा लाइट क्रूड् घेऊन दक्षिण कोरियाला जात होते. त्याची टक्कर हॉंगकॉंगमध्ये नोंदणी असलेल्या अमेरिकेहून धान्य घेऊन येणाऱ्या क्रिस्टल या मालवाहू जहाजाशी झाली होती. क्रिस्टकवरील सर्व खलाशांना वाचवण्यात आले. मात्र टकरीचे कारण समजू शकले नाही.