सायबर हल्ल्यांना रशियाच जबाबदार - ओबामा

सोमवार, 19 डिसेंबर 2016 (10:22 IST)
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या सांगण्यावरून सायबर हल्ले घडवण्यात आले, तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रिया परकीय प्रभावाखाली येणार नाही याची हमी दिली पाहिजे, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले. व्हाइट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ओबामा यांनी पुतिन यांचा सायबर हल्ल्यात हात असल्याचा आरोप केला. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार रशियाने निवडणुकीच्या वेळी हॅकिंग करून सायबर हल्ले केले. ब्लादिमीर पुतिन यांना कल्पना असल्याशिवाय अशी कृत्ये शक्य नाहीत असे सांगून ते म्हणाले, की डेमोक्रॅटिक पक्षाचे इमेल फोडण्याचे काम रशियाने हॅकिंगच्या माध्यमातून केले. 

वेबदुनिया वर वाचा