भारत-पाकने चर्चेने मतभेद दूर करावेत - मून

शनिवार, 24 डिसेंबर 2016 (12:16 IST)
संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी आपल्या कार्यकाळाच्या अंतिम दिवसात पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानदरम्यान चर्चेवर भर दिला आहे. त्यांनी नियंत्रण रेषेवर वाढत्या तणावावर चिंता व्यक्त करत दोन्ही शेजारी देशांना द्विपक्षीय चर्चेद्वारे मतभेदांवर तोडगा काढावा असा सल्ला दिला. बान की मून यांचा महासचिव पदावरील 10 वर्षांचा कार्यकाळ या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. महासचिवांची भूमिका एक सारखीच राहिली. मागील महिन्यात नियंत्रण रेषेवर वाढत्या तणावावर चिंता व्यक्त केली होती असे त्यांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. 

वेबदुनिया वर वाचा