अफगाणिस्तान: अफगाणिस्तान सरकारच्या मीडिया आणि माहिती संचालकाची तालिबानने हत्या केली
शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (11:23 IST)
अफगाणिस्तान सरकारच्या मीडिया आणि माहिती संचालक दावा खान मेनपाल यांची काबूलमध्ये हत्या करण्यात आली आहे.
अहवालांनुसार, मेनपालची बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. तालिबानने हत्येची जबाबदारी स्वीकारली. गेल्या काही दिवसांपासून तालिबानने नेते आणि मंत्र्यांवर हल्ले केले आहेत.
काही दिवसांपूर्वी तालिबानने काबूलमधील संरक्षणमंत्र्यांच्या घरावर हल्ला केला.दावा खानच्या हत्येबाबत तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद म्हणाले की, दावाला त्याच्या कृत्याची शिक्षा दिली आहे.