चीनमधील झुहाई येथे एका चालकाने अनियंत्रित वाहन गर्दीत घुसवले. या भीषण रस्ता अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 43 हून अधिक जण जखमी झाले आहेत. रिपोर्टनुसार, चीनचा प्रतिष्ठित एअर शो सध्या झुहाईमध्ये सुरू आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
या हायप्रोफाईल कार्यक्रमादरम्यान, 62 वर्षीय ड्रायव्हर नियंत्रणाबाहेरील वाहनासह सर्वात व्यस्त भागात पोहोचला. चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हा अपघात आहे की हिट अँड रन, हे सध्या स्पष्ट झालेले नाही. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शोक व्यक्त केला, अपघाताचे कारण लगेच स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी अद्याप या घटनेचा तपशील जाहीर केलेला नाही.
ड्रायव्हर कारमध्ये होता. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी झुहाई शहरात कारच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. अपघातात जखमी झालेल्यांच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. जिनपिंग यांनी कायद्यानुसार दोषींना कठोर शिक्षा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.