आधार पेमेंट अॅप सुरु

मंगळवार, 27 डिसेंबर 2016 (17:01 IST)
डिजिटल आणि कॅशलेस आर्थिक व्यवहार वाढवण्यासाठी सरकारकडून आधार पेमेंट अॅप सुरु करण्यात आले आहे. या मोबाईल अॅपमुळे फक्त आधार कार्ड नंबरच्या सहाय्याने कोणत्याही दुकान, हॉटेल किंवा अन्य ठिकाणी पेमेंट करु शकणार आहोत. यासाठी फक्त आपल्याला अंगठ्याचा ठसा द्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे हे अॅप वापरण्यासाठी स्मार्टफोन असण्याची गरज नाही. पण हे अॅप वापरण्यासाठी आपलं बँक खातं आधार कार्डशी संलग्न असलं पाहिजे. तसंच दुकानदार किंवा पेमेंट स्विकारणा-या व्यक्तीकडे स्मार्टफोन आणि बायोमेट्रिक स्कॅनिंग मशीन असणं गरजेचं असणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा