श्रीलंकेमध्ये बनत आहे सीता मातेचे मंदिर

सोमवार, 29 एप्रिल 2024 (15:38 IST)
Shrilanka : श्रीलंकेमध्ये माता सीतेचे मंदिर बनत आहे. तसेच 19 मे ला या मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. याकरिता श्रीलंकेने उत्तर प्रदेश सरकारकडून अयोध्या येथील पवित्र शरयू नदीचे जल पाठवण्याची विनंती केली आहे. मंदिर ट्रस्टचे म्हणणे आहे की, यामुळे दोन्ही देशांमध्ये संबंध मजबूत होतील व सांस्कृतिक संबंधांना चालना मिळेल. 
 
या वर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच अयोध्या मध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठे  नंतर आता श्रीलंका मध्ये माता सीतेचे एक विशाल मंदिर बनत आहे. या मंदिरात सीता मातेची 19 मे ला प्राणप्रतिष्ठा होईल. त्याकरिता अयोध्या मधील पवित्र शरयू नदीचे जल श्रीलंका मध्ये पाठवण्यात येईल. याकरिता भारत सरकारने प्रक्रिया सुरु केली आहे. 
 
पवित्र शरयू नदीचे जल मागण्यासाठी श्रीलंकेचे प्रतिनिधीमंडळ कडून उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारला पत्र लिहले होते, आणि माता सीतेची मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जल पाठवाल म्हणून विनंती केली. उत्तर प्रदेश सरकारला पत्र मिळाल्यानंतर सरकारने पर्यटन विभागाला जल पाठवण्याची जवाबदारी दिली आहे. 
 
श्रीराम मंदिर ट्रस्टचे म्हणणे आहे की, यामुळे दोघं देशांचे संबंध मजबूत होतील. तसेच अयोध्या तीर्थ विकास परिषद सीईओ संतोष कुमार शर्मा म्हणाले की, श्रीलंकेमध्ये माता सीतेच्या मंदिराचे निर्माण केले जात आहे. मंदिर प्रतिनिधीनीं उत्तर प्रदेश सरकारकडून शरयू नदीचे जल मागितले आहे. आम्ही कलशमध्ये पवित्र जल उपलब्ध करू या मंदिराची प्राणप्रतिष्ठा 19 मे ला होईल.   

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती