गुरुवारी सकाळी पूर्व इंडोनेशियात रिश्टर स्केलवर ७.४ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली. रिश्टर स्केलवर ७.४ तीव्रतेच्या या शक्तिशाली भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली. भूकंपाचा केंद्रबिंदू मोलुक्का समुद्रात, जमिनीखाली सुमारे ३५ किलोमीटरवर होता. या जोरदार भूकंपाच्या धक्क्यांनंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीची माहिती अद्याप उपलब्ध नाही.
यूएस त्सुनामी वॉर्निंग सिस्टीमच्या मते, भूकंपानंतर त्सुनामीच्या लाटा शेजारील देशांपर्यंत पोहोचू शकतात. पूर्व इंडोनेशियातील टर्नाटेच्या किनाऱ्याजवळ, उत्तर मोलुक्का समुद्रात झालेल्या भूकंपानंतर जवळच्या बेटांसाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेच्या त्सुनामी इशारा प्रणालीनुसार, भूकंपाच्या केंद्रापासून १,००० किलोमीटरच्या परिघात इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि मलेशियाच्या किनारपट्टीवर धोकादायक त्सुनामी लाटा येण्याची शक्यता आहे.