भारतीय अमेरिकी आशियायीत तिसऱ्या स्थानावर

वेबदुनिया

गुरूवार, 22 मार्च 2012 (11:56 IST)
PR
अमेरिकी जनगणना विभागाने 2000 ते 2010 च्या लोकसंख्येची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार अमेरिकेत तब्बल 32 लाख अनिवासी भारतीय राहतात. चायनीज अमेरिकन यांची संख्या 38 लाख तर फिलिपिनो नागरिकांची संख्या 34 लाख आहे. गेल्या दशकात अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येत 9.7 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 2000 मध्ये अमेरिकेची लोकसंख्या 28 अब्ज 1 लाख 40 हजार होती. 2010 मध्ये ती वाढून 30 अब्ज 8 लाख 70 हजार झाली.

अमेरिकी आशियायी नागरिकांच्या लोकसंख्येत अनिवासी भारतीय तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चायनीज अमेरिकन पहिल्या स्थानावर असून फिलिपिनो नागरिकांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे. गेल्या दशकात अमेरिकेतील आशियायी नागरिकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्याचे अमेरिकेतील जनगणनेत दिसून आले आहे.

वेबदुनिया वर वाचा