पोलंडमध्ये सापडली नाझींची सोन्याने भरलेली ट्रेन!

पोलंडमधील दोन स्थानिकांनी दुसर्‍या महायुद्धानंतर गायब झालेल्या सोन्याने भरलेल्या नाझींच्या ट्रेनचा आपण शोध लावला असल्याचा दावा केला असून यासंबंधीचे वृत्त पोलंडमधील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर सोने, हिर्‍यांनी भरलेली ट्रेन गायब झाली होती असे म्हटले जाते. 1945 मध्ये जेव्हा रशियन सैन्य आगेकूच करत होते तेव्हा ही ट्रेन पोलंडमधील व्रोक्ला शहरात गायब झाली होती असे म्हटले जाते. मंगळवारपासून संशोधकांनी खोदकामाला सुरुवात केली आहे. या खोदकामात 35 स्वयंसेवक मदत करणार आहेत.
 
दक्षिण-पश्चिम पोलंडमधील वकिलांनी माहिती दिली आहे की दोन व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी या ट्रेनचा शोध लावल्याचा दावा केला आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही व्यक्तींनी ट्रेनमध्ये असलेल्या मुद्देमालामधील 10 टक्के भागीदारी मागितली आहे. विशेष म्हणजे ट्रेनचा शोध लागल्याचा दावा करणार्‍यांची माहिती आणि ट्रेन हरवल्याची गोष्ट यामधील काही गोष्टींमध्ये साम्य असून तथ्य असण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा