पुतीन भारतात येणार चीनला धक्का

बुधवार, 12 ऑक्टोबर 2016 (11:19 IST)
ब्रिक्स देशांचं संम्मेलन गोवा येथे 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान  होणार आहे.  यामध्ये रशियाचे राष्‍ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे देखील सहभागी होणार आहेत.त्यामुळे जगाचे लक्ष इकडे लागले असून पाक आणि चीनला यामुळे मोठा धक्का बसला आहे. 
 
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत पुतीन हे 17 व्या भारत -रशिया समिटचं देखील आयोजन केल आहे. याम पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात दहशतवादाच्या महत्वाचा मुद्दा असून रशिया सुद्धा या विषयावर फार गंभीर झाले आहे.
 
पुतीन  विविध मुद्द्यांवर आपल्या देशाच  समर्थन देखील केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतीन यांच्याशी चांगले संबंध आहते. सर्जिकल स्ट्राईकचं समर्थन देखील पुतीन यांनी केलं होतं आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर ते भारताच्या सोबत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे अमेरिकेचा आपल्याला नसलेला विरोध आणि रशियाचा पाठींबा यामुळे चीन पाकची चांगली गोची होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा