पाकिस्तानमध्ये विकण्यात आले 'ओम' लिहिलेले जोडे, हिंदू समुदाय नाराज

सोमवार, 20 जून 2016 (14:28 IST)
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात काही दुकानदारांनी 'ओम' लिहिलेले जोडे विकले, ज्यामुळे देशाचा अल्पसंख्याक हिंदू समुदाय नाराज झाला आहे आणि याला दुर्भाग्यपूर्ण व ईशनिंदा करणारा आहे असे सांगितले आहे. पाकिस्तान हिंदू परिषद (पीएचसी)चे मुख्य संरक्षक रमेश कुमार यांनी सांगितले की त्या लोकांनी सिंध सरकार आणि तांडो आदम खानचे स्थानीय अधिकार्‍यांसमोर विरोध दाखल करत म्हटले आहे की  येथे ओम लिहिलेले जोडे विकण्यात येत आहे.  
 
कुमार यांनी सांगितले की हे फारच दुर्भाग्यपूर्ण आहे की तांडो आदम खानमध्ये काही दुकानदार ईदच्या प्रसंगी असे जोडे विकत आहे ज्यावर ओम लिहिलेले आहे. असे वाटत आहे की यांचे उद्देश्य हिंदू समुदायच्या भावनांना ठेस पोहोचवणे आहे.  
 
त्यांनी सांगितले की या जोड्याचे फोटो हिंदू समुदायाच्या चिंतित सदस्यांनी सोशल मीडियावर लावले आहे आणि या जोड्यांना दुकानातून लगेचच हटवायची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की अशा जोड्यांची विक्री करणे म्हणजे पाकिस्तानात हिंदू लोकांचा अपमान करणे आहे आणि जोड्यांवर ओम शब्द लिहिणे ईशनिंदा आहे.  
 
पाकिस्तान हिंदू सेवा द्वारे काढलेल्या एका विधानात असे सांगण्यात आले आहे की ओम हिंदुत्वाचा एक पवित्र धार्मिक प्रतीक आहे. स्थानीय सिंधी वृत्तपत्रानुसार या प्रकारचे जोडे सिंधमध्ये काही इतर जागेवर देखील विकण्यात येत आहे. 

वेबदुनिया वर वाचा