जम्मू काश्मीरमध्ये हिंसेमुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्या पार्श्वभुमीवर भारतासोबत युद्ध छेडण्याचे आवाहन जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहील शरीफ यांना केलं आहे. भारताला धडा शिकवण्यासाठी सैन्य भारतात घुसवा, असं आवाहन त्याने पाकिस्तानला केलं आहे.
'हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बु-हान वानीने काही दिवसांपुर्वी मला फोन केला होता. माझी तुमच्यासोबत बोलावं ही शेवटची इच्छा होती. माझी शेवटची इच्छा पुर्ण झाली आहे. आता मी शहीद होण्यासाठी तयार आहे', असंही हाफिज सईदने सांगितलं होतं. याअगोदरही हाफिज सईदने 'काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी भारताने गिलानीच्या ४ मागण्या मान्य कराव्या अन्यथा भारतापुढे युद्ध हा शेवटचा पर्याय असेल', असं वक्तव्य केलं होतं.