पाकला चीन देणार लढाऊ विमाने

सोमवार, 27 एप्रिल 2015 (11:35 IST)
‘जेएफ-१७’ ही आधुनिक लढाऊ विमाने पाकिस्तानला देण्याचे जाहीर करुन चीनने भारताला डिवचले आहे. पाकला चीनकडून ११० विमाने देण्यात येणार आहेत.
 
चीन आगामी तीन वर्षांत ५० जेट विमाने देणार असल्याचे वृत्त रेडिओ पाकिस्तानने दिले आहे. जेएफ-१७ थंडर विमानाच्या निमीर्तीचे तंत्रज्ञान चीनने यापूर्वीच पाकला हस्तांतरित केले असल्यामुळे या विमानांची पाकिस्तानातही निर्मिती होते. मात्र, तालिबान दहशतवाद्यांविरुद्धच्या लढाईसाठी पाकिस्तानला तातडीने मोठ्या प्रमाणात लढाऊ विमाने हवी आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा