पाकच्या माजी पंतप्रधानांच्या अटकेचे आदेश

शुक्रवार, 28 ऑगस्ट 2015 (09:21 IST)
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 
 
ट्रेड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवत फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने पाकिस्तान पीपल्स पाटीर्चे नेते गिलानी यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने गिलानी यांना नोटीस बजावली होती, मात्र त्यांनी दुर्लक्ष 
केले. त्यामुळे न्यायालयाने एफआयएला आजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याची 
परवानगी दिली आहे. तसेच त्यांना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा