पत्नीला 'इबे' वर विकण्यासाठी जाहिरात दिली

लंडन- ब्रिटन येथे 33 वयाच्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीला ई-लिलाव साईट इबे वर विक्रीसाठी टाकलं. त्यानंतर त्याच्या पत्नीसाठी 65,880 पाउंडाची बोली लागली. त्या व्यक्तीप्रमाणे तो आजारी असताना तिने त्याकडे दुर्लक्ष केले म्हणून त्याने हे पाऊल उचलले.
 
वेकफील्ड, यार्कशर येथे राहणार्‍या सायमन ओ’केन याने मागल्या आठवड्यात लिलाव साईट इबे यावर आपल्या 27 वयाच्या पत्नी लिएंड्रा हिचा फोटो टाकला आणि 'यूज्ड वाइफ' शीर्षकाने जाहिरात देत पत्नीला विकण्याचे कारण दिले आणि खरेदी केल्यावर होणारे फायदे आणि नुकसानही सांगितले.
द डेली एक्सप्रेस न्यूजपेपरच्या बातमीप्रमाणे दोन मुलांच्या वडिलांनी हा दावा केले की लिएंड्रा एक समर्पित पत्नीची भूमिका साकारण्यात अक्षम आहे. त्याने तिच्या हाताने बनवलेल्या स्वयंपाकाची मात्र तारीफ केली आहे. दोन दिवसातच तिच्यावरची बोली 65,880 पाउंड पर्यंत पोहचल्याने पती हैराण झाला तसेच पत्नीला ही बातमी कळल्यावर ती पतीचा खून करू इच्छित होती.
 
सायमनने जाहिरातीत हेही लिहिले आहे की पत्नीऐवजी त्याला तरुण मॉडल ऑफर केल्यास तो विचार करेल. ब्युटी थेरपिस्ट म्हणून काम करणारी लिएंड्रा म्हणाली की मला खूप राग आला होता, मला त्याचा खून करण्याची इच्छा होत होती. माझ्या ऑफिसमध्ये सर्व ही जाहिरात बघून थट्टा करत होते. त्याने केवळ मला विकण्यासाठीच जाहिरात दिली नसून माझं वाईट फोटोही शेअर केला.
 
सायमनने म्हटले की काही विक्रेते वाईट प्रत्युत्तर देत होते पण अनेक लोकांचे उत्तर हसवणारे होते. ईबेने जाहिरात हटविल्यामुळे पती निराश आहे कारण त्याला हे बघायचे होते की बोली किती उंच लागते. तरी सायमनने स्पष्ट केले आहे की त्याने केवळ थट्टा म्हणून हे सर्व केले होते. यामागे त्याचा इतर काहीही हेतू नव्हता.

वेबदुनिया वर वाचा